Mahatma Phule Jan Arogya Yojana २०२३ नमस्कार मित्रांनो आज आपण म हात्मा फुले जन आरोग्ययोजना आणि कसा मिळणार पाच लाख ₹ विमा या विषयी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख अत्यंत उपयुक्त असणार आहे.तर हा लेख संपूर्ण आणि काळजी पूर्वक वाचा. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना मिळणार.
अधिवास प्रमाणपत्र धारण 'Mahatma Phule Jan Arogya Yojana' करणाऱ्या नागरिकांनाही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिवास प्रमाणपत्र धारण 'Mahatma Phule Jan Arogya Yojana' करणाऱ्या नागरिकांनाही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिवास प्रमाणपत्र धारण 'Mahatma Phule Jan Arogya Yojana' करणाऱ्या नागरिकांनाही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सर्व १२ कोटीहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
 |
| Mahatma Phule Jan Arogya Yojana |
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण हे प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून ५ लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्ये
राज्यात या आधी केशरी शिधापत्रिका धारकांना व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना च या योजनेचा लाभ भ मिळत असे. परंतु आता, या पुढे राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ अर्थात आरोग्य संरक्षणाचे "Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023" कवच मिळणार आहे.
विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून त्यात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
आयुष्मान भारत योजना -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण लाभ प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रुपये आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण विमा प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रूपये एवढे करण्यात आला आहे.
दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकरच सुरू होणार आहे.
आयुष्मान भारत योजना – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमल बजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या १३५६ एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या १ हजार एवढी आहे.
Aayusyman Bharat yojana
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण २.५ लाख एवढी मर्यादा आहे. ती आता ४.५ लाख रुपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ayushman Bharat yojana
म हात्मा फुले जन आरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांत १४० व कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात १ लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.
0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !