Mini Tractor Anudan Yojana Maharashtra नमस्कार, शेतकरी बंधूंनो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने मिनी ट्रॅक्टर या योजने मार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ९०% अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतक्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल यासाठी गरजू शेतक्यांना मिनी ट्रॅक्टर योजने मार्फत ट्रॅक्टर घेण्यासाठी शासन ९०% अनुदान देणार आहे. शेतातील विविध कामे करण्या करिता 'Mini Tractor Anudan Yojana Maharashtra'  शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात. अशा शेतकऱ्यासाठी शासनाने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. मिनी ट्रॅक्टर योजने साठी लागणारी पात्रता, आवश्यक कागपत्र आणि अर्ज कोठे करावा या विषयी माहिती आपण या लेखात पहाणार आहोत.


Mini  Tractor Anudan Yojana Maharashtra
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra 


Mini Tractor Anudan Yojana Maharashtra 


 योजनेची उद्दिष्टे :


या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे हा आहे. त्याद्वारे त्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ त्यांचे  उत्पन्न देखील वाढवण्यात येईल. त्यांच्या साठी रोजगार निर्माण होऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल. Mini Tractor Anudan Yojana Maharashtra  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना उत्पादनाचे साधन निर्माण होऊन त्यांचे राहणीमान बदलावे त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी येत्या 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.


योजनेचे लाभाचे स्वरूप

बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.


योजनेच्या अटी व शर्ती

१) स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी लिंक करावे, 

२) केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात

३) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत

४)  स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच           अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत

५)  ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. 3.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

६) मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या "Tractor Anudan Yojana Maharashtr" योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाला स्वत: खर्च करावी लागेल.

७) ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.



योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : 

  1. बचत गटाचे घटना पत्र
  2. बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
  3. कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र
  4. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स 
  5. बँक पासबुक
  6. सात बारा 
  7. गाव नमुना आठ
  8. बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी 


योजनेसाठी अर्ज चालू असलेला जिल्हा व अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत : ही योजना सध्या परभणी जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे .परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात भेट द्या.या योजनेचे अधिक माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती दिली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांना अर्ज करायचा असेल त्यांनी लेखी अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक ती दर्शवलेली सर्व कागदपत्रे जोडून सदर अर्ज हा समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त परभणी यांच्याकडे जमा करावा.

संपर्क – संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

 

ऑनलाइन अर्ज : Apply online