balsngopan yojana' सदर शासन निर्णया अंतर्गत बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे. बाल संगोपन योजना ही २००५ मध्ये सुरू करण्यात आली. अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला मुलींना संस्थेत दाखल कारण ऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरण ऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडून आणने हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना संस्थाबाह्य योजना आहे. या योजने अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना मुलींना पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी ठेवता येते. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
![]() |
bal sngopan yojana sngopan yojana |
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजनेचा उद्देश :
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी लाभार्ती पात्रता :
१) अनाथ,निराश्रित, बेघर, निराधार, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील
२) अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही.
३) एक पालक असलेली बालके ( एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, परित्याग, अविवाहित मातृत्व, पालक विभक्ती करण ई.)
४) कुटुंबातील तणाव/तंटे/न्यायालयीन वाद ई. कौटुंबिक संकटात बाधित बालके
५) कुष्टरुग्ण पालकांची बालके, जन्म ठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांची बालके, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, एच आय वी ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, ४० % अपंगत्व, अंध, दिव्यांग, sngopan yojana भिक्षा मागत असलेली बालके, पोक्सो अधिनियम अंतर्गत बळी पडलेली, कुपोषित बालके.
६) दोन्ही पालक दीव्यांग असलेली बालके.
७) रस्त्यावर राहणारी शाळेत न जाणारी कामगार बालके
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बाल संगोपन योजने अंतर्गत मिळणारा लाभ :
या योजने अंतर्गत प्रती बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषन अनुदानात ₹११०० वरून वाढ करून ₹ २२५० एवढे करण्यात आले आहे व स्वयंसेवी संस्थेच्या सहायक अनुदानात ₹१२५ वरून ₹२५० एवढे करण्यात आले आहे. या योजनेसाठी निवड केलेल्या कुटुंबाच्या नावाने बॅकेत/पोष्ट कार्यालयात त्वरित खाते उघडण्यात यावेत. त्या खात्यावर दरमहा अनुदानाची रक्कम भरण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांची असेल. "Bal sngopan yojana" या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य विषयक सुविधा, शिक्षण ई. सुविधा स्म्बधित कुटुंबाच्या वतिने पुरवल्या जातील.
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बाल संगोपन योजनेच्या अटी शर्ती :
१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालकांचे वय १८ वर्षे व त्या खालील असणे आवश्यक आहे.
२) बाल संगोपन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांनाच घेता येईल.
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्ती निवडीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
१) रहिवासी दाखला
२) लाभार्ती व पालक यांचे आधार कार्ड (छायांकित प्रत)
३) लभार्त्याचे/ वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा कमी असल्याचा दाखला
४) दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, आई/ वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यू झाल्याचा दाखला
५) जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
६) ३ ते १८ वयोगटातील लाभार्ती हा शिक्षण घेत असल्यास (शाळेची गुणपत्रिका / बोनाफाईड जोडावी)
७) बँक अकाऊंट क्रमांक (पासबुकची छायांकित प्रत)
८) बालकाचा सांभाळ करत असलेल्या जैविक पालका व्यतिरिक्त संगोपन कर्त्याचे/ नातेवाईकांचे हमी पत्र
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बाल संगोपन योजना असा करा ऑफलाईन अर्ज :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या जिल्हाच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून वर सांगितलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून त्या अर्जाची पोचपावती संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा.पहा शासन निर्णय : Download

0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !