Shaley Ganvesh Yojana
नमस्कार, मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो राज्य शासन हे आपल्या साठी एक नवीन कार्यक्रम राबवत आहे.
त्या नुसार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, सॉक्स, इत्यादी साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देते. ह्या वर्षा पासून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे असा शासन निर्णय आला आहे.
![]() |
| Shaley Ganvesh Yojana |
Shaley Ganvesh Yojana
Mofat Ganvesh Yojana
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत मोफत गणवेश योजनेतून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी च्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.
सध्याच्या परिस्थितीत उपरोक्त शाळेतील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. तर २०२३ पासून सदर विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच मोफत गणवेश योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट आणि दोन जोडी पायमोजे (सॉक्स) देण्यात येतील असे देखील ठरवले आहे.
Shaley Ganvesh Yojana
शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्याशाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्यावर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातींचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेेखालील पालकांची सर्व मुले याचबरोबर योजनेपासून वंचित राहणारे इतर प्रवर्गातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना दरवर्षी दोन गणवेश मोफत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मोफत गणवेश योजने प्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे (सॉक्स)यांचा देखील लाभ शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मोफत गणवेश आणि एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे (सॉक्स) या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून करावयाची असल्याने त्या बाबतची तातडी लक्षात घेऊन मोफत गणवेश योजने पासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रती विद्यार्थी ६००₹ याप्रमाणे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ७५.६० कोटी तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करून देण्यासाठी प्रती विद्यार्थी १७०₹ याप्रमाणे ८२.९२ कोटी एवढा निधी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्वसाधारण राज्य हिस्स्या च्या रक्कमेतून खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.सदर योजना ही राज्य योजना असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्यात येत आहे व त्या अंतर्गत या योजनेवरील खर्च भागविण्यास तसेच प्रत्येक वर्षी लाभार्थी विद्यार्थी संखयेनुसार निधी अर्थसंकल्पीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !